बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने बुधवार दि. २८/८/२०२२ रोजी मुख्याध्यापिकासौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत “गोकुळअष्टमीचा ” सोहळा मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
सुंदर सुशोभन मांडून सोप्या शब्दात गोकुळअष्टमी का साजरी केली जाते , त्यामागील कृष्ण जन्माची गोष्ट मुलांना सांगीतली . मुल कृष्ण , राधा , वसुदेव , देवकी , सुदामा अशा सुंदर रूपात तयार होउून आली होती. हंडी फेडून सर्व मुलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.