बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने बुधवार दि. १४/८/२०२४ रोजी मुख्याध्यापिकासौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत “स्वातंत्र्यदिनाचा” सोहळा मोठया दिमाखात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सुंदर सुशोभन मांडून मुलांना सोप्या शब्दात स्वातंत्र्यदिनाची ,झेंडयाची माहिती सांगून झेंडयाच्या रंगाचे महत्व सांगण्यात आले. कारण हया सस्कारांची शिदोरी घेउूनच ही मुले पुढे जाणार आहेत. आणि त्यासाठीच हा सर्व प्रयत्न !मुलांनीही अगदी एकाग्रतेने सर्व आत्मसात केले. देशभक्तीने ओथंबलेल्या वातावरणात सारेच तल्लीन झाले होते.
