दि.२१/६/२०२४ शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. मुलांना योगाचे महत्व कळावे .तसेच शरीर व मन कसे सुदृढ होते याचे महत्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी दोन्ही विभागाच्या मोठया गटातील मुलांचा योगा करून घेतला. मुलांनी छान आनंद घेत योगा केला
·मंगळवार दि. १६/७/२०२४ रोजी दोन्ही विभागाची आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा सोहळा मोठया उत्साहात व आंनदात साजरा करण्यात आला. विदयार्थ्यांनी विठठल ,रुख्मिणी ,वारकरी यांचा पोषाख केल्याने ते अतिशय सुंदर दिसत होते. विदयार्थ्यांच्या या तयारीत पालकांचा उत्साह व सहभाग होता.
