बाल विदया प्रसारक मंडळ संचलित, आदर्श मॅान्टेसरी मंदिर मध्ये , मुख्याध्यापिका सौ. गुंजन लच्छवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली , बुधवार दि. १८/११/२०२४ ते २३/१२/२०२४ रोजी सर्व गटातील विदयार्थ्यांसाठी “ क्रिडा महोत्सव” आयोजित करण्यात आली होता.विदयार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा , त्यात वाढ व्हावी , मुलांना मैदानी खेळ खेळायला मिळावै तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी या क्रिडा स्पर्धेचे सर्व गटातील विदयार्थ्यासाठाी आयोजन करण्यात आले होते. सर्व गटांतील विदयार्थ्याला वेगवेगळे विषय दिलेले होते.
नर्सरी – धावणे , सशाच्या उडया मारणे , रांगणे
मधला गट – धावणे , गोलात वाटरबॅग ठेवणे , दप्तरात वस्तू भरणे.
मोठा गट – धावणे , बेडूकउडया मारत साहित्य गोळा करणे ,विटेवरून तोल सांभाळून चालणे.
