संपर्क. (+०२५३) २५०० २२६

शाळे विषयी



श्री मनोज नारायण बिरारी ,
मुख्याध्यापक

B.Sc.(Chemistry, First Class), B.Ed. (First class)

Nts, mts, nmms यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
स्काऊट गाईड च्या अनेक उपक्रमांचे आयोजन.
सह शालेय उपक्रमांचे यशस्वी आयोजन


बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श मद्यमिक विद्यालयाची स्थापना 1984 मध्ये झाली. राज्य शासनाच्या नियोजनानुसार सर्व अभ्यासक्रम येथे राबविले जातात. विद्यालयाचे दैनंदिन कामकाज मा. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने समर्थपणे चालते. अर्थात त्यांच्यावर शालेय समिति व व्यवस्थापक मंडळाचे लक्ष असते.
मराठी माध्यामाबरोबर आता सेमी इंग्रजीची सुविधा इ. 5 वी पासूनच उपलब्ध करून दिलेली आहे. शाळेची इमारत प्रशस्त असून सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. विद्यालयात इ. 5 वी ते 10 वी चे प्रत्येकी 4 वर्ग असून विद्यार्थी संख्या 1500 च्या वर आहे.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम, शालाबाह्य स्पर्धा व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले जाते.


इतर उपक्रम


विद्यार्थांचे शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांमधील कौशल्य वाढावे ह्या उद्देषाने संस्थेच्या व्यवस्थापनाने प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. सदर प्रशिक्षण वर्ग शाळेतच होणार आहेत. पालकांनी आपल्या पाल्यासाठी ह्या उपक्रमांचा जरूर लाभ घ्यावा.

शैक्षणिक उपक्रम

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पर्धा परिक्षा - गणित , इंग्रजी,संस्कृत,
  • हिंदी राष्ट्रभाषा परिक्षा
  • एलीमेंट्री चित्रकला परिक्षा इ.
  • प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इ. 4 थी.
  • माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इ.7 वी.
  • अॅबॅकस (गणित)1ली ते 6 वी
  • वैदिक गणित 7 वी ते 10 वी
  • फोनेटिक इंग्रजी 1 ली ते 7 वी (मराठी माध्यम )
  • हस्ताक्षर सुधार प्रशिक्षण वर्ग (7 दिवस)इंग्रजी,हिंदी ,मराठी,


खेळ व इतर उपक्रम

  • कराटे
  • जिम्नॅस्टिक
  • मल्लखांब
  • स्काऊट व गर्लगाईड
  • संगीत व कॅसिओ
  • रोलर स्केटिंग