प्रिय पालक,
बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1984 मध्ये झाली. राज्य शासनाच्या नियोजनानुसार सर्व अभ्यासक्रम येथे राबविले जातात. विद्यालयाचे दैनंदिन कामकाज मा. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने समर्थपणे चालते. अर्थात त्यांच्यावर शालेय समिति व व्यवस्थापक मंडळाचे लक्ष असते.
मराठी माध्यमाबरोबर आता सेमी इंग्रजीची सुविधा इ. 5 वी पासूनच उपलब्ध करून दिलेली आहे. शाळेची इमारत प्रशस्त असून सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. विद्यालयात इ. 5 वी ते 10 वी चे प्रत्येकी 4 वर्ग असून विद्यार्थी संख्या 1500 च्या वर आहे.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम, शालाबाह्य स्पर्धा व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले जाते.