संपर्क. (+०२५३) २५०० २२६

शाळे विषयी

Principal
श्री. रमेश महादू आहिरे , मुख्याध्यापक
बीए डिएड
शालेय व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाज

  • बाल विद्या मंदिर, मराठी प्रायमरीची स्थापना सन 1957 मध्ये झाली.

    सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन मानसिक, शारिरिक क्षमतांचा विकास करून सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावी अध्यापनाला सुसज्ज दृकश्राव्य कक्ष आणि संगणक कक्ष यांची जोड उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष उल्लेखनीय अशी संगणकीय शिक्षण संवाद प्रणाली वर्गावर्गातून उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन शालेय व्यवस्थापन विद्यार्थी विकासासाठी झटत आहे.

    सुविकसित , सुसंस्कृत, सुजाण विद्यार्थी घडविण्याचे हे पवित्र कार्य आपल्या सहकार्यानेच साध्य होईल यात शंका नाही.


    शासकीय धोरणानुसार नमूद केलेल्या शैक्षणिक नियमप्रणालीनुसार शाळेत अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. दैनंदिन शालेय कामकाज शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रशिक्षित व कुशल शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात येते. यास शालेय समिती तसेच संस्थेचे माननीय विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शन व नियंत्रण लाभते.

    शाळेची इमारत प्रशस्त व सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशी आहे. शालेय सुचनांचे माध्यम मराठी आहे. शालेय सत्रास माहे जून पासून सुरुवात होते.

    शालेय माहिती :

    • इयत्तावार वर्ग : इयत्ता 1 ली ते 4 थी : एकूण वर्ग : 13