संपर्क. (+०२५३) २५०० २२६

होम

Chairman

प्रिय पालक,
बाल विद्या प्रसारक मंडळ परिवारामध्ये आपले मन:पूर्वक स्वागत! सुमारे 63 वर्षा पूर्वी नाशिक पुण्यनगरीतील काही दूरदृष्टीच्या विचारवंतांनी बालकांच्या उज्जवल भवितव्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन दि. 24 सप्टेंबर 1947 रोजी बीजारोपण केलेला हा ज्ञानवृक्ष अल्पावधीतच बहरला. आज हा वृक्ष शिशुवृंद,प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, अध्यापन विद्यालय असा सर्वांगिण बहरलेला आहे. मराठी माध्यमाबरोबरच आज इंग्रजी माध्यमातूनही शिक्षणाची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे.

1966 साली सुरू झालेल्या आमच्या अध्यापन विद्यालयात मराठी माध्यमाचे प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष असे 2 वर्ग आहेत.

सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन मानसिक, शारिरिक क्षमतांचा विकास करून सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावी अध्यापनाला सुसज्ज दृकश्राव्य कक्ष आणि संगणक कक्ष यांची जोड उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष उल्लेखनीय अशी संगणकीय शिक्षण संवाद प्रणाली वर्गावर्गातून उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन शालेय व्यवस्थापन विद्यार्थी विकासासाठी झटत आहे.